शबनम न्युज | पिंपरी
“काळभोर नगर” येथे सत्ततची होणारी वाहतुक कोंड़ी व नोपार्किंग यामुळे स्थानिक नागरीकांना त्रास होत आहे. तरी या सर्व प्रकरणातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी योग्य ती पावले उचलून वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत सर्वांना सुचित करावे अथवा आपल्या विभागामार्फत योग्य ती कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर यांनी वाहतुक विभागाला दिले.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, “काळभोर नगर” चिंचवड परिसरात नित्याची होणारी वाहतूक कोंडीबाबत बाबत परिसरात असणाऱ्या “टीव्हीएस शोरूम” समोरील रस्त्यावर तसेच “ऐश्वर्या मॉल” च्या बाजूस व मागे आणि “प्रतिभा कॉलेज” काळभोर नगर येथे येणाऱ्या वाहनचालक व्यक्तींकडून सतत नो पार्किंग मध्ये गाड्या लावल्या जात आहेत. परिणामी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि स्थानिक नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. अनेक वेळा वादाचे प्रसंग ही उद्भवत आहेत सतत नो पार्किंग मध्ये वाहने लावणे त्यामुळे होणारे वाहतूक कोंडी आणि उद्भवणारे वादाचे प्रसंग यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे अरुंद रस्ते आणि त्यामध्ये होणारी वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांचा खूप वेळ खर्च होत आहे. तरी आपण वरील ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी नोपार्किंग मध्ये होणारी बेशीस्त वाहन पार्किंग या सर्व प्रकरणातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी योग्य ती पावले उचलून वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत सर्वांना सुचित करावे अथवा आपल्या विभागामार्फत योग्य ती कारवाई करावी, असे निवेदनाद्वारे सांगीतले.
यावेळी राष्ट्रवादी शहरउपाध्यक्ष सतीश बाराहाते, पिंपरी विधानसभा सरचिटणीस खंडेराव काळे, निखिल पवार, किरण मोरे, सचिन मोकाशी, विकास ठांनांबीर, अतुल चव्हाण, मोहित धीवर, साजीत शेख़, विशाल सजगने, इब्राहिम शेख़, आदित्य सोनवने आदी उपस्थित होते.