शबनम न्युज | पिंपरी
भारतीय स्वातंत्र्याचा उगवता सुर्य पाहिलेल्या दापोडी फुगेवाडीतील 75 ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सन्मान सोहळा 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता जैन स्थानक,निरा सोसायटी जवळ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर,दापोडी पुणे या ठिकाणी मा. स्विकृत सदस्य अनिकेत राजेंद्र काटे यांच्या वतीने विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
प्रसंगी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लढ्यातील काही प्रसंगारूपी भावना व्यक्त करून नवीन पिढीला देशाला प्रगती करण्यासाठी मौलिक माग॔दश॔न केले.याप्रसंगी दापोडी फुगेवाडी भागातील ज्येष्ठ नागरिक,महिला वग॔ मोठ्या संख्येने उपस्थितीत होता.
यावेळी राजाभाऊ काटे मा.विरोधी पक्षनेते,पिं.चिं. मनपा दापोडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री जयवंत मोरे(मामा), सोपान नाना भाडाळे एकनाथ बहिरट, सोपान नाना काटे,श्री.सुभाष बोधे,श्री. च॔द्रकांत काटे पोलीस पाटील , चंद्रकांत काटे राष्ट्रीय खेळाडू अरूण राजाराम काटे, मुरलीधर अण्णा काटे,प्रल्हाद धोंडीबा काटे, विजय बोत्रे,वसंत काटे सुभाष शहा, शोभाबेन शहा,सुनिल भाऊ मोरे सर, दिपक काटे, नितीन बोधे,संजयभाऊ गाडुते,प्रदीप पोतदार, कुमार भाऊ मते,अविनाश भाऊ काटे, आशिषभाऊ काटे,महामाया प्रतिष्ठानच्या सौ.विद्या ताई गायकवाड,रोकडे ताई, कार्यक्रमाचे मुख्य आयोजन श्री अनिकेतदादा राजेंद्र काटे यांनी केले तर सूत्रसंचालन हे नितीन कांबळे यांनी केले.