शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित, जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज चिखली येथे शाळेच्या नूतन वास्तुमधील पहिला स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२२. प्राचार्या डॉ.मृदुला महाजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने पालक उपस्थीत होते. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निवृत्त क्रीडा अधिकारी श्री.राजु पी कोतवाल सर, वाय.सी.एम. हॉस्पिटलमधील माजी फ़िजिओथेरपिस्ट विभाग प्रमुख डॉ. जयश्री कोतवाल आणि पिंपरी चिंचवड महानगपालिका क्रिडा प्रबोधिनी प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू ऐश्वर्या साठे तसेच सदर शाळेचे संचालक ह.भ.प. श्री राजु महाराज ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री राजु कोतवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच काहीं विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषणे केली. यावेळी श्री कोतवाल सर आणि सौ. साठे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व तसेच विदयार्थी जीवनातील आरोग्यदायी आहाराचे महत्त्व सांगितले. संस्थेच्या संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षीका रचना बडवे यांनी केले. शाळेचे संस्कृत शिक्षक श्री सखाराम पितळे सरांनी उपस्थीत सर्व पाहुण्यांचे आणि पालकांचे आभार प्रदर्शन केले.