शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिरूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महारक्तदान शिबिराचे मतदारसंघात चाळीस ठिकाणी आयोजन केले होते. त्यात तीन हजार ४९६ बाटल्या रक्त जमा झाले.सर्वाधिक प्रतिसाद भोसरी विधानसभा मतदारसंघात मिळाला. तेथे एक हजार २६८ बाटल्या रक्त संकलित झाले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना अभिवादन म्हणून हे शिबिर भरविण्यात आले होते. त्याची सुरवात स्वत डॉ.खा.कोल्हे यांनी जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे रक्तदान करून केली. नंतर दिवसभरात जुन्नर,आंबेगाव,खेड-आळंदी,शिरू
शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी भोसरी विधानसभा मतदारसंघाने या रक्तदान शिबिरात जशी आघाडी मारली,तशीच ती भोसरीतीलच नेहरूनगर या रक्तदान केंद्रानेही मारली. शिरूरमधील ४० रक्तदान केंद्रापैकी सर्वाधिक म्हणजे तब्बल ३७३ बाटल्या रक्त नेहरूनगर येथे संकलित केले गेले. भोसरी (१२७२),जुन्नर (७७६), शिरूर (४७८),आंबेगाव (४७७),हडपसर (३९७) आणि खेड (९७) असे या विधानसभा मतदारसंघनिहाय रक्तदान झाले.भोसरीतील रक्तदान यशस्वी होण्यासाठी भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिलाध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष राहूल भोसले, सरचिटणीस आणि प्रवक्ते विनायक रणसुंभे, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर,दिपक साकोरे,वसंत बोराटे आदींनी परिश्रम घेतले.खा. डॉ. कोल्हे यांनी दिवसभरात अनेक रक्तदान केंद्रांना भेटी दिल्या.भोसरीतील मोशी आणि इंद्रायणीनगर येथील रक्तदानाचीही त्यांनी पाहणी केली.