शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी बंडु बबन मारणे यांना पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मिरर यांच्या वतीने दिला जाणारा बिग सेल्युट अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे. १३ ऑगस्ट रोजी हॉटेल हयात कल्याणी नगर, आगाखान पॅलेस जवळ दुपारी चार वाजता झालेल्या पुरस्कार सोहळ्यात सदर पुरस्काराने बंडू मारणे यांना सन्मानित करण्यात आले.
पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागीय प्रशासकीय आणि समर्पित सेवेसाठी हा पुरस्कार दरवर्षी पुणे टाइम्स मिरर यांच्यावतीने दिला जातो. पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर बंडू मारणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मिळालेल्या पुरस्काराने आपल्या कामाची जबाबदाऱी अनेक पटीने वाढते. तसेच नागरिकांचे अपेक्षा उंचावतात. मी या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मिरर यांचे आभार व्यक्त करीत असेच कार्य पुढील काळातील करत राहणार असल्याचे यावेळी बंडू मारणे यांनी सांगितले.