शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
१५ ऑगस्ट देशाच्या स्वतंत्रता अमृत महोत्सवानिमित्त दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे श्री अभय दादा भोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दुर्गा ब्रिगेड अध्यक्ष कु.दुर्गाताई भोर यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन येथे विविध उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी यावेळी प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार तसेच दिलीप सोनगिरा आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मेट्रो स्टेशन मध्ये प्रथमच चालू मेट्रोमध्ये फॅशन शो आयोजित करण्यात आला आणि स्टेशनवर फॅशन शो व चालू मेट्रो मध्ये पहिल्यांदाच विविध कार्यक्रम करण्यात आले. तसेच मुलींनी लाठीकाठी याची प्रत्यक्ष दाखविली, आणि मंगळागौर सादर करण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येने शहरातील महिला वर्गांनी आणि नागरिकांनी उपस्थित लावून स्वतंत्रता दिन उत्साहात साजरा केला .कार्यक्रमात सहभागी कलाकारांना ब्रँड अँबेसिडर अभय भोर, माधुरी पवार आणि दिलीप सोनगीरा, दुर्गा भोर यांच्या हस्ते प्रशासकीय पत्र देण्यात आले.