
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त देशभरात अमृत महोत्सवाची हर घर तिरंगा ,अभियान चालू आहे, घरोघरी देशभक्ती जागृत होत आहे, यातच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने स्वतंत्र्याचा राष्ट्रीय सण साजरा केला .माजी महापौर योगेश बहल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर प्रमुख पाहुणे म्हणून गुणवंत कामगार अण्णा जोगदंड ,नगरसेविका सुलोचना धर-चिलवंत,जेष्ट पत्रकार शिवाजीराव शिर्के उसस्थित होते.
यावेळी गुणवंत कामगारांना आण्णा जोगदंड यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि त्यागासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांच्या स्मृतीला उजळ देऊन “हिंदुस्तानची शान तिरंगा आपला स्वाभिमान “भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या . देशभक्तीपर गीते लावून परिसर दणाणून सोडला.

कामगार कल्याण मंडळाच्या वतीने माजी केंद्र संचालक सुरेख पवार यांच्या हस्ते मंडळातील लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले,लहान मुलांनीही भक्ती गीते गायली, यावेळी केंद्र उपसंचालिका सुरेखा मोरे यांनी मंडळाच्या शिवण काम वर्ग,हस्तकला वर्ग,शिष्यवृत्ती योजना, पाठयपुस्तक योजना, अशा अनेक कामगारासाठी व कुटुंबासाठी शासनाच्या कल्याणकारी योजनाची माहिती दिली तर त्यांनी केंद्रात येऊन जास्तीत जास्त कामगारांनी कामगार कल्याण मंडळाचे सभासद होण्याची आव्हान ही केले . जेष़्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के म्हणाले कि माझे भाग्य आहे कि मी लहान असताना देशाचा पहीला स्वातंत्र्य दिन पाहण्याचा योग आला व आज 75 वा अमृतमोहत्व साजरा करण्याचे भाग्यमला मिळाले.

यावेळी मा.महापौर योगेश बहल, नगरसेविका सुलोचना धर-चिलवंत, गुणवंत कामगार आण्णा जोगदंड, जेष्ट पत्रकार व गुणवंत कामगार शिवाजीराव शिर्के,मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या शहर अध्यक्षा संजना करंजवणे,माजी केंद्र संचालक सुरेश पवार ,केंद्र उपसंचालीका सुरेखा मोरे,संगिता क्षीरसागर, ह.भ.प यादव तळोले,ह.भ.प.शामराव गायकवाड, शंकर नानेकर,गुणवंत कामगार गोरखनाथ वाघमारे सा.का.किरण कोळेकर, रविंद्र राणावत,तृप्ती राणावत,शैलेजा आवडे सह अनेक कामगार उपस्थित होते.
