शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते भारतीय राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण पार पडले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महापालिकेच्या सुरक्षा दल, अग्निशामक दल तसेच तृतीयपंथी ग्रीन मार्शल, रिव्हर मार्शल आणि सुरक्षा दलाच्या वतीने सलामी देण्यात आली.
अग्निशामक दलाच्या वतीने पाण्याच्या तुषारांद्वारे भारतीय तिरंग्याची प्रतिकृती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या तसेच विविध शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय, वंदे मातरम’ असा नारा देत महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात प्रभातफेरी काढली. आज महापालिकेत रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रम प्रसंगी विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, मुख्य लेखापरिक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, उपआयुक्त रविकिरण घोडके, चंद्रकांत इंदलकर, संदिप खोत, विठ्ठल जोशी, अजय चारठाणकर, सचिन ढोले, मनोज लोणकर, यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय उपअधिक्षक डॉ. उज्वला आंदूरकर, डॉ. मनिषा सूर्यवंशी, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, वामन नेमाणे, बाळासाहेब खांडेकर, सुषमा शिंदे, निलेश देशमुख, श्रीनिवास दांगट, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंभासे, बाळासाहेब गलबले, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ. वर्षा घोगरे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे, माजी महापौर अपर्णा डोके, माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसेवक नामदेव ढाके, अमित गावडे, गोविंद पानसरे, माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, मीनल यादव, कर्मचारी महासंघाचे आजीमाजी अध्यक्ष बबन झिंजुर्डे, अंबर चिंचवडे यांच्यासह महापालिका कर्मचारी तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.