- शंकर शेठ जगताप, मा. मंदार देव महाराज यांच्या शुभहस्ते उद्घाटन
- आता पिंपरी चिंचवड शहरात बहुतांश शाडू मातीच्याच मूर्ती ; प्रशासनाने देखील पीओपी बंदी साठी केली कडक नियमावली
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
एखादा सामजिक उपक्रम हाती घेतल्यानंतर त्याला सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड असल्यास उपक्रम यशस्वी होतोच आज त्याचा शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन चे उपक्रमात त्याचा प्रत्यय आला अशी प्रतिक्रिया शंकर जगताप यांनी दिली. शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन संचालित १०० % शाडू मातीच्या गणेश मूर्ती विक्री शंकर शेठ जगताप, मा. मंदार देव महाराज यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
सलग गेली ३ वर्षे पवना नदी संवर्धनासाठी जातात असताना आणि सोबत आपले जिवंत जलस्रोत कायम स्वच्छ सुंदर आणि जिवंत राहावेत यासाठी सण समारंभ साजरे करत असताना निसर्गाची काळजी घ्यावी आणि प्राप्त परिस्थिती मध्ये पर्यावरण पूरक सण समारंभ साजरे व्हावेत यासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन आणि त्याला कृतीची जोड देण्याचे काम शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन ने केले आहे.
आजचे चित्र सकारात्मक आहे, बदल घडतो आहे आपण ज्या नदी मधून पाणी पितो ती जिवंत राहण्यासाठी, स्वच्छ राहण्यासाठी जो तो झटतो आहे. गणेशोउत्सव साजरा करताना प्रत्येक नागरिक घरच्या घरी गणेश मूर्ती विसर्जित करत आहेत आणि शाडू मातीच्या गणपतीचा स्वीकार करत आहेत. याही वर्षी अत्यंत कमी दरात ना नफा ना तोटा या तत्वावर शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन यांनी दोन ठिकाणी शाडू मातीचे विक्री केंद्र चालू केले आहेत दोन्ही केंद्राचा उदघाटन समारंभ नुकताच कार्यसम्राट आमदार श्री. लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू शंकर शेठ जगताप, चिंचवड देवस्थान चे विश्वस्त मंदार देव महाराज,मा. नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे,मा.नगरसेवक मोरेश्वर शेडगे, भारत केसरी पै. विजय गावडे,लायन्स इंटरनॅशनल चे गव्हर्नर ओमप्रकाश पेठे,सह्याद्री प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी चे अध्यक्ष गणेश बोरा, माजी अध्यक्ष सचिन खोले यांचे शुभहस्ते पार पडला.
शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन गेली १० वर्षे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करताना त्याला कृतिशील जोड देत आहे,या फाउंडेशनच्या माध्यमातून गणपती दान या उपक्रमासाठी परिसरातील चौकाचौकात कृत्रिम हौद बसविणे, घरोघरी निर्माल्य दान करा कंपोस्ट खत मिळवा या उपक्रमांतर्गत निर्माल्य गोळा करून नागरिकांना तातडीने कंपोस्ट खत देणे, घरातल्या कचऱ्याचे कंपोस्ट बनविण्यासाठी जनजागृती, स्वच्छता अभियान, देशी वृक्ष लागवड मोहीम या आणि या सारख्या अश्या असंख्य उपक्रमांनी गणेशोत्सवात कार्य केले जाते, सवलतीच्या दरात शाडू मातीच्या अस्सल मूर्ती उपलब्ध करून देऊन नागरिकांना घरच्या घरी विसर्जन करायला प्रबोधन करणे हा त्यातीलच एक भाग आहे.
यावेळी सन्माननीय उपस्थिती मध्ये गणेश शेठ गावडे, दत्ताभाऊ चिंचवडे,-उपाध्यक्ष,भाजपा पिं चिं शहर जिल्हा,भाजप व्यापारी आघाडीचे शहर अध्यक्ष राजेंद्र चिंचवडे, उद्योजक हरिभाऊ चिंचवडे, दीपक गावडे, पै.बाळा दळवी, कमलाकर गोसावी, धंनजय गाडे, अनिल गावडे, अमित पांढरकर, हाके सर, उद्योजक योगेश जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.