शबनम न्युज | मावळ
अनाथ निराधार आजी-आजोबांसाठी असलेल्या आंदर मावळमधील कुसवली येथील सहारा वृध्दाश्रमात बाॅलीवुड मधील प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
Advertisement
सहारा वृध्दाश्रमाचा प्रथम वर्धापनही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच असल्याने या प्रसंगी त्यांची पत्नी अनुपमा, मुलगा अग्निदेव हे कुटूंबिय देखील उपस्थित होते. आश्रमातील जोशी आजोबा व शिंदे आजोबा यांनी हिंदी चित्रपटातील देशभक्तीपर गीते यावेळी त्यांच्यासमोर गायली. सहारा वृध्दाश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी सर्वांचे स्वागत केले.
Advertisement