शबनम न्युज | पुणे
युवक क्रांती दल, भारतीय समाज विकास व संशोधन संस्था आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, सत्याग्रही विचारधारा मासिकाचे संपादक, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी २१ ऑगस्ट २०२२ रोजी ८२ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आणि ‘डॉ. कुमार सप्तर्षी : व्यक्ती आणि कार्य : बहुआयामी परिवर्तन प्रेरणा’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.रविवार, २१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता गांधी भवन, कोथरूड, येथे हा कार्यक्रम होईल.डॉ. अंजली सोमण यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे.
आबेदा इनामदार( उपाध्यक्ष, महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, पुणे ) यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. कल्याण तावरे ( प्रसिध्द उद्योजक, रसिक वाचक ) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहें. प्रसिध्द निवेदक सुधीर गाडगीळ हे डॉ.कुमार सप्तर्षी यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.डॉ. कुमार सप्तर्षी जीवन गौरव समिती,युवक क्रांती दल, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी हे कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत.
Advertisement