शबनम न्युज | पिंपरी
१५ ऑगस्ट भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित मा. नगरसेवक शैलेश प्रकाश मोरे यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यामध्ये एम्पायर इस्टेट, विस्डम पार्क, कोहिनूर शांग्रीला सोसायटी, साहिल रेसिडेन्सी, आनंदनगर, चिंचवडगाव या ठिकाणी घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात आले.
यावेळी ३०००. नागरिकांच्या घरी तिरंगा वाटप करण्यात आले, तसेच एम्पायर इस्टेट येथे तिरंगा रॅली काढण्यात आली व एम्पायर इस्टेट येथील झेंडा चौकात झेंडा फडकविण्यात आला. या प्रसंगी जपान येथील योग प्रशिक्षक क्लैरी नागशिमा (Claire Nagashima) यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. तसेच प्रभागांमधील माजी सैनिकांचा मोठ्या प्रमाणात सत्कार करण्यात आला. तसेच एम्पायर इस्टेट येथे कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली व आनंदनगर येथे खाऊ वाटप करण्यात आले.
या प्रसंगी मा. नगरसेवक प्रसाद शेट्टी, मा. नगरसेवक काळुराम पवार, एम्पायर इस्टेट येथील जेष्ठ नागरिक संघाचे संजय साळवी साहेब, हरीश ललवाणी, महेश कोरे, राम खेडकर, रामदास माळी, सौ. मीनाक्षी संकपाळ, सुबोध सावंत, अनिल पाटील, विजय पिंगळे, राजेंद्र चौथे, कल्याण देवघरे व सौ. कविता शैलेश मोरे व एम्पायर इस्टेट मधील नागरिक उपस्थित होते.