शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी मधुकर बच्चे युवा मंच व ‘क’ कॅलिग्राफी तसेच शशिकला फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आपली माती, आपला गणपती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड भाजपा सचिव मधुकर बच्चे यांनी दिली आहे.
नागरिकांना स्वतःच्या हातांनी गणपती मूर्ती बनवून त्याचा आनंद घेता यावा व पर्यावरण पूरक शाडू मातीचा वापर करून मूर्ती बनवून त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करता यावी, या सामाजिक हेतूने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी मधुकर बच्चे यांनी सांगितले
तसेच सदर कार्यशाळा कै. शिवाजी भोईर सांस्कृतिक हॉल, प्रभाग क्रमांक १८ चिंचवड येथे रविवार दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे. तसेच सदर कार्यशाळेत प्रभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी व लहान मुलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मधुकर बच्चे यांनी केले आहे. तसेच नावनोंदणी करण्यासाठी ७७५५९२०५४४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांवतीने करण्यात आले आहे.