शबनम न्युज | पुणे
पुणे सोलापूर महामार्गावरील कदमवाक वस्ती परिसरात शनिवारी पहाटे एका भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन बहिणींचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
छकुली कुमार शितोळे (वय.१७) आणि राजश्री कुमार शितोळे (वय,१० दोघेही हवेलीतील कवडीपाट येथे राहणारे) अशी मृतांची नावे आहेत. स्थानिक ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता ११ वीची विद्यार्थिनी छकुली आणि इयत्ता ६ वीची विद्यार्थिनी राजश्री त्यांच्या काकांसह शाळेत जात असताना सकाळी ७ च्या सुमारास हा अपघात झाला, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेत त्यांचे काका जखमी झाले आहेत. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Advertisement