शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरातील ‘मोशीची मानाची दही हंडी’ साठी साईनाथ मित्र मंडळ वतीने पुढाकार घेण्यात आला. आकर्षक विद्युत रोषणाई, डिजेने वाजविलेले आकर्षक संगीत, तरुणाईचा उसळलेला जनसागर यामुळे मा. नगरसेवक वसंत बोराटे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव सर्वच पिंपरी-चिंचवड करांसाठी आकर्षक ठरला. सुमारे वीस ते पंचवीस हजार तरुणाईच्या प्रचंड गर्दी समोर गोविंदा पथकाने ही मानाची दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. मोशी परिसरात आकर्षक झुंबरावर दहीहंडी बांधण्यात आली होती. त्यावर एलईडीने केलेली विद्युत रोषणाईमुळे उत्सवाचे वेगळेपण अधोरेखीत होत होते. एलईडी लाईट आणि वेगवेगळे लेझर हे विद्युत रोषणाईला आणखीन आकर्षक करत होते.
मोशी परिसरातील असंख्य जनसागर या दही हंडी उत्सवात सहभागी झाला होता. साईनाथ मित्र मंडळ वतीने हंडी फोडत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दही हंडी फोडणाऱ्या गोविदांना जमलेल्या जनसमुदायाने प्रोत्साहन दिले. मोशी करांचे भरभरून प्रेम या दही हंडी उत्सवाला मिळाले. तसेच या दही हंडी उत्सवात नागरिकांनी हजारोच्या संख्येने गर्दी करून एकच विक्रम प्रस्थापित केला.
या उत्सवानिमित्ताने या परिसरातील मा. नगरसेववक वसंत बोराटे यांच्या माध्यमातून एकूण ५ लाखांचे बक्षिसांचे वाटप करण्यात आले. या उत्सवात एकूण ३० गोविंदा पथक मंडळांनी सहभाग घेतला. या उत्सवाचे प्रमुख आकर्षण सिने अभिनेत्री निधी अग्रवाल, ऋता दुर्गुळे, स्मृती केळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या सिने अभिनेत्रींना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची अलोट गर्दी या दही हंडी उत्सवाच्या निमित्ताने जमली होती. यावेळी वसंत बोराटे यांनी सांगितले कि, दोन वर्षानंतर झालेला हा महोत्सव सर्वांना मनातून आनंद देणारा ठरला आहे. यामुळे आलेली मरगळ दूर झाली असून आगामी काळात पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे.
या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने नागरिकांचा उत्साह पाहण्याजोगा होता. मा. नगरसेवक वसंत बोराटे यांच्या माध्यमातून हा दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात व भव्य दिव्य असा साजरा झाला. मा.नगरसेवक वसंत बोराटे यांना मानणारा मोठा वर्ग या दहीहंडी उत्सवात सामील झाला होता. मा.नगरसेवक वसंत बोराटे यांनी अनेक सामाजिक कार्य केली. नगरसेवक पदावर असताना प्रभागाचा विकास मोठ्या प्रमाणात करून त्यांनी जनतेच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. वसंत बोराटे यांच्या हाकेला हाक देत हजारो नागरिक त्यांना साथ देतात, त्यांच्या कार्यक्रमात सामील होतात. त्यांनी आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमात या असंख्य नागरिकांचा सहभाग असतो. नगरसेवक वसंत बोराटे यांच्या माध्यमातून अनेक नागरिकांना लाभ मिळाला आहे. त्यामुळेच त्यांनी या दहीहंडीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात असंख्य नागरिकांची अलोट गर्दी पहावयास मिळाली व हा दहीहंडी उत्सव खूप मोठ्या संख्येने साजरा झाला.
यावेळी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, उप शहराध्यक्ष अतिश बारणे व परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. या सर्व उपस्थितांचे मा. नगरसेवक वसंत बोराटे यांनी आभार व्यक्त केले.