शबनम न्युज | पिंपरी
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत दापोडी फुगेवाडी येथील आई उद्यान या ठिकाणी ७५ वृक्ष आज सोमवार दिनांक २२/०८/२०२२ सकाळी ११ वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.
या प्रसंगी मा.स्विकॄत सदस्य अनिकेत काटे पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्यान विभागाचे सुभाष इंगळे उपायुक्त उद्यान अधिक्षक , श्रीमती मनिषा तापकीर सहाय्यक उद्यान अधिकारी, दत्तात्रय अडागळे उद्यान निरिक्षक,राजाराम शिरसाठ सुपरवायझर उद्यान विभाग,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयवंत मामा मोरे गावडे, इमाम शेख, नितीनभाऊ बोधे, जितेंद्र चव्हाण,अनिल कांबळे, सचिन कोष्टी, आशिष काटे तसेच उद्यान विभागातील कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते.
आई उद्यानामध्ये फिरायला येणा-या नागरिक,ज्येष्ठ नागरिक, लहान मुले त्याचप्रमाणे महिला वर्ग यांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नसल्या कारणाने त्यांची सतत गैरसोय होत असल्याने पिण्याच्या पाण्याची सोय नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात यावी,अशी मागणी या प्रसंगी मा.स्विकॄत सदस्य अनिकेत राजेंद्र काटे यांनी संबंधित उद्यान विभागातील अधिकारी वर्गाकडे केली.