शबनम न्युज | मुंबई
पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून विरोधकांनी आजही विधानभवनाच्या पायर्यांवर शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ओला दुष्काळ जाहीर करा.. अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत करा, पन्नास खोके.. एकदम ओके, ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी, स्थगिती सरकार हाय हाय, आले रे आले गद्दार आले, अशा घोषणा देत आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.
परंतु, माजी मंत्री धनंजय मुंडे अधिवेशनाच्या नियमित कामकाजासाठी सभागृहात दाखल झाले मात्र आज विरोधकांनी राज्य सरकारच्या विरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर उभे राहत घोषणा दिल्या. मात्र यावेळी धनंजय मुंडे कुठे दिसले नाहीत.
Advertisement