शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील रामनगर, विद्यानगर, मोहननगर, शंकरनगर, दत्तनगर काळभोर नगर भागातील धोकादायक वायरिंग व धोकादायक पोल व तसेच उघडे डीपी दुरुस्तीबाबत विशाल काळभोर (प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र, प्रभारी पुणे शहर ज़िल्हा) यांनी महावितरण अधिकार कवडे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, परिसरातील धोकादायक वायरिंग व धोकादायक पोल तसेच उघडे डीपी त्याचप्रमाणे विविध सोसायटीतील ट्रांसफार्मर परिसरातील धोकादायक झाडी काढणे तसेच काही दिवसांवरती श्री गणेश उत्सव मोठया उत्साहात सार्वजनिक गणेश मंडळे साजरा करत असतात यावेळेस मिरवणुकीच्या दरम्यान धोकादायक वायरिंग मुळे मोठी दुर्घटना होऊ शकते किंबहुना अपघात होऊ शकतो तरी आपण वरील विषयावरती काम करून सहकार्य करावे, असेही सदर निवेदनात विशाल काळभोर यांनी नमूद केले आहे.