शबनम न्युज | पिंपरी
प्रभाग क्र.१९ मधील आनंदनगर येथील रहिवाशांना विजेचा त्रास होत होता याबददल त्यांनी स्थानिक मा. नगरसेवक शैलेश प्रकाश मोरे यांच्या कडे तक्रार केली.
या तक्रारीचे दखल घेत शैलेश मोरे यांनी थेट स्थानिक जागी भेट दिली व रहिवाशांशी संवाद साधत अडचण समजाऊन घेतली.ज्या ठिकाणी लोकांना विजेचा त्रास होत होता त्या जागी असलेला विजेचा ट्रान्सफार्मर खराब झाला आहे आणि वारंवार विज पुरवठा खंडीत होत आहे असे रहिवाशांकडुन सांगण्यात आले. शैलेश मोरे यांनी संबधित अधिकारी यांना त्वरीत तो ट्रान्सफार्मर बदलून त्या जागी नविन ट्रान्सफार्मर बसवण्यात यावा अशी सुचना केली. शैलेश मोरे यांच्या पाठपुरावा मुळे आज त्या जागी नविन ट्रान्सफार्मर बसवण्यात आला असून त्याठिकाणचा विज पुरवठा सुरळीत झाल्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी मा. नगरसेवक शैलेश मोरे यांचे आभार मानले.
Advertisement