पुणे पीपल्स को ऑप. बँकेची सन २०२२-२०२७ पंचवार्षिक निवडणूक रविवारी (दि. २८) होत आहे. यानिमित्ताने सहकार पॅनलच्या वतीने पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी, सहकार पॅनेलचे उमेदवार आणि विद्यमान संचालक दिलीप उत्तमराव दगडे, संजय रमेशलाल गुगळे, अंबर किसनराव चिंचवडे यांच्यासह इतर उमेदवार दिलीप साहेबराव तनपुरे, महेंद्र ज्ञानोबा जगताप, मोरेश्वर सदाशिव देशपांडे, शिरीष जिजाबा मोहिते, आनंद रमेशलाल चोरडिया, मनोज पद्माकर नऱ्हेकर, राजू काशिनाथ साळुंके, संवेदीता मंदार बारसावडे, सुनील तुकाराम खोंड व स्वाती संपत ढमाले उपस्थित होते.
संजय गुगळे म्हणाले, “बँकेची वार्षिक व्यवसायवृद्धी ही महागाई दराच्या दुप्पट म्हणजे १८ टक्के, एकूण व्यवसाय पाच वर्षांत २५०० कोटीवरून ५७०० कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. आधुनिक तंत्रज्ञानासह व्यायसाय वृद्धीची जाण असलेल्या नवीन सेवकांची भरती, औद्योगिक क्षेत्रातील कामगार, बचत गटांना आधुनिक बँकिंगच्या सुविधा, सभासदांना अपघाती विम्याचे संरक्षण, ठेवीदार व सेवक प्रतिनिधींना संचालक मंडळावर प्रतिनिधित्व, पारदर्शक कर्मचारी भरती, मोबाईल बँकिंग, युपीआय/क्यूआर कोड, एसएमएस यासह इतर ऑनलाईन सुविधांवर भर दिला जाणार आहे.”