शबनम न्युज | मुंबई
आज पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करीत आहे. यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गद्दार, कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करणाऱ्या विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. हो मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. मी राज्याच्या विकासाचं कंत्राट घेतलं आहे. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं, राज्याला पुढे नेण्याचं कंत्राट घेतलं आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. ते म्हणाले माझा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून केला. राज्याचा कुणीही मुख्यमंत्री असू द्या. नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलले तेव्हा केंद्रीय मंत्री असताना त्यांना जेलमध्ये टाकून दिले. मुख्यमंत्र्याविरोधात अपशब्द वापरले. या देशाच्या लोकशाहीत घटनेप्रमाणे आम्ही इथं बसलोय. बहुमत सिद्ध करून बसलोय. आम्ही घटनेविरोधात कृत्य करणार नाही. जे अध्यक्ष आहेत त्यांना घटनेचा अभ्यास आहे. वैचारिक पातळी घसरली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आज माझा कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख झाला. गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत काही विधान केले म्हणून त्यांना थेट जेवणावरून उचलून तुरुंगात टाकले होते. कशासाठी तर त्यांनी मुख्यमंत्र्यांचा अपमान केला म्हणून. पण आम्ही घटनेप्रमाणे, कायद्याप्रमाणे बहुमत सिद्ध करून पदावर बसलोय. आम्ही कायद्याविरुद्ध कुठलंही पाऊल उचलणार नाही. मी एकच सांगेन ही वैचारिक पातळी एवढी खालावली आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.