आरोपीने महिलेचा खून केल्याची दिली कबुली
सलग दहा दिवस अथक प्रयत्नातून अँटी गुंडा स्कॉडला यश
पिंपरी चिंचवड : महिलेचा खून करणारा आरोपी पिंपरी चिंचवड शहरातील अँटी गुंडा स्कॉड च्या जाळ्यात अडकला आहे त्याला भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पूजा प्रसाद या महिलेचा खून 16 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास लांडेवाडी भोसरी येथे झाला होता सदर खुनाची कबुली आरोपीने दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामकिशन शंकर शिंदे राहणार कारेगाव जिल्हा पुणे याने मयत पूजा ब्रिज किशोर प्रसाद राहणार भोसरी या महिलेचा गळा चिरून खून केला याप्रकरणी महिलेचे पती ब्रिज किशोर शिवचंद्र प्रसाद यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पूजा प्रसाद यांचे लांडेवाडी येथे कपड्याचे दुकान आहे दरम्यान 16 ऑगस्ट रोजी सकाळी पूजा यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे दुकान उघडले दुकानात साफसफाई चे काम करीत असताना एक जण त्यांच्या दुकानात घुसला काही कळण्याच्या आत त्यांनी पूजा यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने पूजाप्रसाद यांचा मृत्यू झाला या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला भोसरी पोलिसांसह गुन्हे शाखेची विविध पथके आरोपीचा शोध घेत होती दरम्यान अँटी गुंडा स्कॉड ने सलग दहा दिवस परिसरातील सुमारे 250 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली त्यावेळी रांजणगाव येथे ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरून नेणारा आरोपी आणि पूजा प्रसाद यांचा खून करणारा आरोपी एकच असल्याची माहिती या पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी आरोपीची माहिती काढून कारेगाव परिसरात सापळा लावून रामकिशन शंकर शिंदे याला अटक केली आरोपी रामकिशन याने पैशांची आवश्यकता असल्याने हा खून केल्याचे पोलिसांना सांगितले त्याच्या विरोधात यापूर्वी ठाणे शहर मधील कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत आरोपीला भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे पोलीस उपयुक्त काकासाहेब डोळे, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर ,सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली