शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील क्रीडा क्षेत्रातील अग्रगण्य असलेली संस्था संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने व मुक्ती उदारसेवा ट्रस्ट पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील डॉन बॉस्को मैदान येथे युवक, मुले आणि महिलांसाठी विविध क्रीडा व खेळाचे उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांना खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात एकूण शंभर खेळाडूंनी सहभाग घेतला. सर्व क्रीडा स्पर्धा अति उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदेश बोर्डे यांनी खेळाच्या महत्त्व बाबत जनजागृती करणे हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात अॅड. प्रसाद सांगळे (कायदा अधिकारी), रेजी थॉमस (मुक्ती उदार सेवा ट्रस्टचे संस्थापक व सरचिटणीस), श्रीमती एस्थर हिवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व प्रमुख उपस्थितांनी आपल्या भाषणात संदेश बोर्डे फाउंडेशन वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. या कार्यक्रमात आयोजित स्पर्धेत विजेते ठरलेल्या खेळाडूंचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला.