शबनम न्युज | पिंपरी
गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या श्री दशभुजा लक्ष्मी गणपतीची प्रतिष्ठापना चिंचवडगावातील गांधी पेठेत हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे सचिव उत्तम दंडिमे यांच्या हस्ते बुधवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी विधिवत पूजन करून करण्यात आली.
Advertisement
माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ नागरिक संघाचे विक्रांत ओतारी, ललित थोरात, सुहास पोफळे, इक्बाल शिकलगार आणि गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. गणेशोत्सवाचे हे चव्वेचाळिसावे वर्ष आहे. यावेळी अथर्वशीर्ष पठण आणि पूजाअर्चा करण्यात आली. विपुल नेवाळे, संदीप जंगम, धीरज गुत्ते, जयेश घुमे, नागेश हटकर, आरिफ पटेल यांनी संयोजन केले.
Advertisement