शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी उद्यान पूर्णानगर येथे ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवेश देण्यात यावे, अशी मागणी भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे दिली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पिंपरी चिंचवड महानगरपलिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातुन शहरातील जेष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले जात असतात. या वर्षी नुकतेच जेष्ठ नागरिक संघासाठी विरंगुळा साधत म्हणून रंगीत टेलीव्हिजन संच मोफत देण्यात आलेले आहेत. असे असताना भारतरत्न अटबिहारी उद्यान, पुर्णानगर येथे मात्र जे नागरिकांकडुन प्रवेशासाठी र.रु. २०/- इतके शुल्क आकारले जात आहे. हा विरोधाभास असुन जेष्ठ नागरिक है सकाळ – संध्याकाळ विरंगुळ्यासाठी उद्यानात येत असतात. त्यांना प्रत्येक दिवशी प्रति प्रवेशावेळी २० शुल्क भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांचा विरंगुळाच महापालिकेने हिरावुन घेतला आहे. जेष्ठ नागरिकाना भारतरत्र अटविहारी उद्यान, पुर्णानगर येथे मोफत प्रवेश दिल्यास त्यांना त्या ठिकाणी विरंगुळा करणे शक्य होईल तरी पिंपरी चिंचवड महानगरपलिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून शहरातील जेव नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून भारतरत्र बिहारी उद्यान, पुणानगर व इतर उद्यानातही जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवेश देवून त्यांना दिलासा द्यावा, असेही सदर निवेदनात एकनाथ पवार यांनी नमूद केले आहे.