शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहर तसेच सर्वच शहरात गणरायाचे आगमन यावर्षी धुमधडाक्यात झाली आहे. यावर्षीचा गणेशोत्सव हा अनेक मानाने महत्त्वाचा व उत्साहवर्धक तसेच आनंदाने साजरा होणारा उत्सव आहे. कारण मागील दोन वर्षापासून संपूर्ण देशात गणरायाचे आगमन झाले नाही. कोरोना काळात अनेक निर्बंध असताना सण उत्सव साजरा न करण्याचेही निर्बंध शासनाच्या वतीने लावण्यात आल्याने २०२० व २०२१ या दोन वर्षात गणेशोत्सव साजरा करण्यात आला नाही. परंतु, यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरा होताना आपणास पाहावयास मिळत आहे. यावर्षी अतिशय उत्साहात जल्लोषात आनंदात हा गणेशोत्सव साजरा होत आहे. सर्वांना सुखी ठेवणारा गणराया, सर्वांचेच विघ्न दूर करणारा गणराया अशी गणरायाची महती असून या गणरायाच्या उत्सवाच्या निमित्ताने भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मंडळांना भेटी देत अण्णासाहेब मगर बँकेचे विद्यमान चेअरमन व वेदिक वीजडम एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा. राजेश सस्ते जनजागृती करत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील अण्णासाहेब मगर बँकेचे विद्यमान चेअरमन व वेदिक वीजडम एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा. राजेश सस्ते यांनी या गणेशोत्सवानिमित्त गणरायाच्या विविध मंडळांना भेट दिली. तसेच मागील दोन दिवसापासून या गणेश मंडळाला भेटी देऊन गणरायाची आरती केली. व या गणेशोत्सवात अनेक तरुणांनी सहभाग घ्यावा, परंतु व्यसनापासून दूर राहावे, तसेच बेरोजगारीला आळा घालण्यासाठी तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता रोजगार व्यवसाय करावा, असे आवाहन केले आहे. तसेच येणाऱ्या काळात आपले आरोग्य निरोगी राहावे, यासाठी प्लास्टिक मुक्त शहर, प्लास्टिक मुक्त राज्य व प्लास्टिक मुक्त देश असा नारा देत अनेक गणेश मंडळाच्या माध्यमातून जनजागृती केली व अनेक तरुणांनी अशीच जनजागृती करावी, असे आवाहन राजेश सस्ते यांनी केले आहे.
अनेक मंडळांना भेटी देऊन गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढविण्याचे कार्यही राजेश सस्ते यांनी केले आहे. गणेशोत्सव निमित्ताने आपण आपल्या देशात अनेक सामाजिक उपक्रम राबवू शकतो. तसेच आपल्या देशातील तरुणांना योग्य दिशेने यशस्वीमार्गावर घेऊन जाऊ शकतो, या उत्सवाचे निमित्ताने नागरिकांना सामाजिक महत्त्व समजावून सांगण्यात राजेश , सस्ते यांनी पुढाकार घेतला आहे. या निमित्ताने अनेक गणेश मंडळांनी राजेश सस्ते यांचे स्वागत केले. त्यांच्या हस्ते गणेश आरती करून गणेशोत्सव साजरा करत असल्याचे अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे.