आयुक्तांनी त्वरित दखल घ्यावी, विशाल काळभोर यांची मागणी
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील काळभोर नगर लगत असलेल्या कंपनीमधून होणाऱ्या दूषित वायू प्रदूषणामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या वायू प्रदूषणामुळे कुजट वास येणे तसेच श्वसनाच्या बाबतीत त्रास होणे, आरोग्याला धोकादायक वातावरण निर्मिती होणे अशा अनेक समस्यांमुळे या परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. या परिसरात रहिवासी तसेच शाळा असल्याने या रहिवासी नागरिकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या प्रदूषित वातावरणामुळे खोकला, सर्दी, डोळे लाल होणे खाज येणे व श्वसनाचे त्रास होणे असे विविध आजार वाढत आहे. या परिसरातील लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांना होणाऱ्या त्रासामुळे आरोग्याच्या अनेक समस्या वाढल्या आहेत. तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आयुक्त शेखर सिंह यांनी त्वरित याबाबत दखल घेऊन संबंधित कंपन्यांवर उचित कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे विशाल काळभोर यांनी केली आहे. त्यांनी निवेदनात सर्व परिस्थिती दर्शविली आहे. सदर निवेदन देताना विशाल काळभोर यांच्यासह विशाल सजगणे, विकास ठाणबीर, यासीन खान आदी उपस्थित होते.