पुण्यात उडत्या बसेसची योजना आणली तर, आम्ही पैसे देऊ – नितीन गडकरी
शबनम न्युज | पुणे
पुण्यात चांदणी चौकातील वाहतूक समस्या वाढताना दिसत आहे. शहरात वाहतूक समस्या ही अत्यंत गंभीर स्वरूपाची पाहायला मिळत आहे. शहराचे नागरिक ही वाहतूक समस्यामुळे त्रस्त झाले आहेत. या सर्व समस्यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपाय सुचविला आहे.
पुण्यात उडत्या बसेसची योजना आणली तर, आम्ही त्यासाठी पैसे देऊ शकतो, असं नितीन गडकरी यांनी जाहीर केलं आहे. आज पुण्यात चांदणी चौकातील वाहतूक समस्या आणि इतर मुद्द्यांवर बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “आम्ही १६५ रोप वे केबल कार बांधतोय. आमच्याकडे हवेत उडणारी बस आहे. त्यात १५० लोक बसतात आणि ती वरच्यावर जाते. ती डॉफल मेअरची आहे. त्यासाठी आमच्याकडे पैसे आहेत. वरच्यावरून ट्रॅफिक गेलं, तर त्याचा फायदा होईल. त्यासोबतच ट्रॉली बसचा एक पर्याय आहे. त्यात दोन बस जोडल्या जातात आणि ती इलेक्ट्रिक केबलवर चालते. इलेक्ट्रिक बसची किंमत सव्वाकोटी आहे. तेवढ्याच क्षमतेच्या या ट्रॉलीबसची किंमत ६० लाख आहे. त्यामुळे भांडवल गुंतवणूक कमी आहे. पुणे पालिकेनं अशी काही योजना तयार केली, तर आम्ही त्यासाठी पैसे देऊ असं ही नितीन गडकरी म्हणाले.