शबनम न्युज | पुणे
५ सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिन आपण शिक्षकदिन म्हणून साजरा करतो,त्याच निमित्ताने विद्यार्थी एक दिवस शिक्षकांची,प्राचार्या,उपप्राचार्य,शिपाई यांची भूमिका उत्साहाने पार पाडतात.अनुभवांची शिदोरी सोबत घेवून जीवन पार करतात.याच निमित्ताने सरस्वती माध्यमिक विद्यालय,सिंधुनगर पुणे -४४ या शाळेतील इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन साजरा केला. त्यांना आलेले अनुभव आपल्या शब्दातून व्यक्त केले आणि विशेष म्हणजे त्यांचे मोठेपनी शिक्षक होण्याचेच स्वप्न आहे.
जिवंत व्यक्तींशी संवाद साधता येतो,आपलेपणा अनुभवायला मिळतो,हा अनुभव त्यांनी आज घेतला.या प्रसंगी ज्योती सोनवणे,मोनु पवार,रुपाली शिंदे,श्रावणी भंडारी,भाग्यश्री निलगी,गायत्री पाचारे,तनुजा मलंगनेर,आयेशा मुलाणी,वैभवी रुद्राक्ष,वैभव कांबळे इत्यादी विद्यार्थी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा.दाभाडे सर यांनी स्वीकारले,तसेच प्रमुख उपस्थिती शाळेच्या प्राचार्या सौ.दातीर मॅडम,उपप्राचार्य बच्चे सर,पर्यवेक्षक काळोखे सर,पर्यवेक्षिका सौ.आहेर मॅडम उपस्थित होते.आहेर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता सातवीचे वर्गशिक्षक सौ.चौधरी मॅडम,सौ. भालेराव मॅडम,सौ.बनसोडे मॅडम,सौ.काळे प्रतिमा मॅडम आणि श्री.प्रदीप गायकवाड सर यांनी केले.विद्यार्थी शिक्षक यांना खाऊ वाटप करण्यात आला.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.