शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात गणेश उत्सव सध्या मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होत आहे. गेल्या दोन वर्षापासून हा गणेशोत्सव साजरा झाला नाही. परंतु, यावर्षी गणरायाचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब मगर बँकेचे विद्यमान चेअरमन व वैदिक विस्डम एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा. राजेश सस्ते व सामाजिक कार्यकर्त्या , जय मल्हार सुवर्ण संजय योजनेच्या अध्यक्ष अर्चना सस्ते यांनी मतदारसंघाचे यांनी भोसरी विधानसभा आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गणेश मंडळांना भेट देत गणरायाची आरती केली. तसेच जनजागृती करण्याचे अभियान सुरू केले आहे.
या अभियाना अंतर्गत शिवतेज मित्र मंडळ आमराई , सहकार मित्र मंडळ या मंडळांना भेटी देत देणगी देण्यात आली. तसेच अनुष्का कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला सस्ते कुटुंबियांच्या वतीने देणगी देण्यात आली.