शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
‘‘केंद्र आणि राज्य सरकारच्या समवेत सायन्स सिटीबाबत तातडीने बैठक घेण्यात येईल, तसेच सायन्स सिटी पिंपरी-चिंचवड शहरात होणार आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. पुणे-मुुंबई महामार्गावरील महापालिकेच्या वतीने उभारलेल्या विज्ञान केंद्रास केसरकर यांनी बुधवारी सकाळी भेट दिली. तेव्हा ते बोलत होते.
Advertisement
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विज्ञान केंद्रास शिक्षणमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, युवक कल्याण आणि क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी प्रभागअध्यक्षा अनुराधा गोरखे, प्रकल्पाचे मुख्याधिकारी प्रवीण तुपे आदी उपस्थित होते.
Advertisement