शबनम न्युज | पुणे
“आमचे मिशन इंडिया, मिशन महाराष्ट्र सुरू आहे. बारामती हे महाराष्ट्रातच येते. त्यामुळे मिशन महाराष्ट्रात बारामती देखील आहे” असा टोला फडणवीसांनी पवारांना लगावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या बारामतीबाबत भाष्य केले.
Advertisement
बारामती लोकसभेचा गड उद्ध्वस्त करू, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी बारामती दौऱ्यावर असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता फडणवीसांनीही भाजपाचे मनसुबे बोलून दाखवले आहेत.
Advertisement