शबनम न्युज | किवळे गाव
किवळे गावात सिद्धिविनायक मित्र मंडळ किवळेगाव रौप्य उत्सव निमित्त बापू दिनकर कातळे यांच्या वतीने भजन स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. तसेच या स्पर्धेमध्ये पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये तीन क्रमांक ठेवण्यात आले होते. तसेच या स्पर्धेत स्वरांजली भजनी मंडळ, ताथवडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच द्वितीय क्रमांक जय गणेश महिला भजनी मंडळ, रावेत गाव यांनी तर ओम नम शिवाय महिला भजनी मंडळ, किवळे गाव यांनी तृतीय क्रमांक पटकावला असून उत्कृष्ट भजनी मंडळात गायत्री भजनी महिला भजनी मंडळ,श्री गणेश महीला भजनी मंडळ, पदमावती भजनी मंडळ धामणे, घोराडेश्वर महिला भजनी मंडळ व दुर्गा माता महिला भजनी मंडळ, या सर्व मंडळांनी सहभाग नोंदविला होता तसेच या सर्व सहभागी भजनी मंडळास श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
तसेच यावेळी परीक्षक, सुप्रसिद्ध पखवाज वादक कु. स्वप्निल सूर्यवंशी सर, सुप्रसिद्ध गायक श्री. प्रदीप मोहिते सर, उत्कृष्ट गायक:- रमेश कांदळकर, उत्कृष्ट गायिका:- अनिता लोखंडे, उत्कृष्ट पखवाज वादक यश भालेराव व परिसरातील नागरिक उपस्थित होते.