शबनम न्युज | पिंपळे सौदागर
आज महाराष्ट्र राज्याचे माजी उमुख्यंमत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी गणेशउत्सवानिमित्त अजित पवार यांच्या हस्ते पिंपळे सौदागर परिसरातील शिवशंभो सेवा मंडळ, क्रांती मित्र मंडळ, क्रांती क्रिडा मंडळ आदी मंडळाच्या श्री गणेशाची आरती अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मंडळांचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार यांनी माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शितल काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. यावेळी नाना काटे व शितल काटे यांच्या वतीने दादा चा सत्कार श्री गणेशाची मुर्ती व शाल, पुष्पगुच्छ देवुन करण्यात आला. या सत्कार प्रसंगी राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, माजी महपौर संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक मयुर कलाटे आदी मान्यवर उपस्थित होते.