शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
‘महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद’ व ‘गुड सॅमरीटन ग्रुप’ (पिंपरी चिंचवड, पुणे ) यांच्या संयुक्त विद्यमाने “शिक्षक दिनाचे” औचित्य साधून शहरातील विविध भागातील १० शिक्षकांचा सन्मान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते, ते पुढे म्हणाले “शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असते कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, उद्योजक, शिक्षक आणि विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. आधुनिकतेच्या प्रवाहात तरुण मुले सोशल मीडियावर अधिक प्रमाणात वेळ वाया घालवून बिघडत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्याला पुस्तकी धड्यासोबत अध्यात्मिकतेची जोड दिली तर तो कुमार्गाला कधी जाणार नाही” असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. ॲड.प्रसाद सांगळे आपल्या भाषणात म्हणाले, “शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यावर तसेच समाजावर चांगले संस्कार करतात. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा खरा मित्र व मार्गदर्शक आहे.”
चर्च ऑफ द नॅझरीन, कासारवाडी, पुणे येथे शिक्षक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध उद्योजक मा.विश्वास दळवी सर, मा.ॲड.प्रसाद सांगळे सर (विधी अधिकारी, सहाय्यक पोलिस आयुक्तालय, येरवडा विभाग) आणि मा.पूर्णाचंद्र स्वाईन सर (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अल्पसंख्याक सेल, पिंपरी चिंचवड) हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या हस्ते पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शिक्षकांचा सत्कार सन्मानचिन्ह, शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
यावेळी रेव्ह.रमेश साळवी यांनी सुरुवातीची प्रार्थना केल्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. पा.सॅमसन चोपडे व पा.संतोष वाघमारे यांनी स्तुती आराधनेद्वारे परमेश्वराचे गौरव केले. सि.शैला हेक्टर यांनी पवित्र शास्त्रातील वचनातून वाचन करत उपस्थित शिक्षकांना उत्तेजन दिले.
१) मा.शर्वरी गोवंडे मॅडम (प्रिन्सिपल, सेंट मेरीज ज्यूनीयर काॅलेज, पुणे),
२) मा.मिनाक्षी सुधीरकुमार कांबळे (जिजस कॉल्स , व्ही.बी.एस टिचर, पिंपरी),
३) मा.सरोजिनी शिमोन नंदिकर (ॲक्सीस प्री-प्रायमरी स्कूल, प्राधिकरण),
४) मा.सरोज बथूएल कांबळे (म.न.पा. शाळा, चिंचवड),
५) मा.हन्ना विद्युलता गुणवंत भुजबळ (ज्ञान प्रबोधिनी हायस्कूल, निगडी),
६) मा.रिबेका महेश कदम (जी जी इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे सौदागर),
७) मा.कमल फिलीप कसबे (श्री हरिशचंद्र झेंडेपाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, पुणे),
८) मा.विजयमाला प्रसन्न हिवाळे (जिल्हा परिषद शाळा, नायगाव),
९) मा.मार्या भास्कर देठे (सेंट जाॅन स्कूल, पुणे),
१०) मा.रबाजी गजाबा शेळके (स्पोकन इंग्लिश स्कूल, मोशी) या सन्माननीय दहा शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. सर्व शिक्षकांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन सि.वनिता पिल्ले यांनी त्यांच्या आरोग्यासाठी व कुटुंबासाठी प्रार्थना केली. या समयी उपस्थित शिक्षकांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीत घडलेल्या अनुभवाचे कथन केले.
या कार्यक्रमात रेव्ह.रमेश साळवी, पा.सुधीरकुमार कांबळे आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पा.बन्यामिन काळे यांनी केले. शिघ्र कवी लाझारस सूर्यवंशी यांनी शिक्षकांना उद्देशून आपली कविता सादर केली. या कार्यास ब्र.विश्वास दळवी, पा.सुधीरकुमार कांबळे आणि बिशप रमेश शिवाजी दळवी सरांनी आर्थिक हातभार लावला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन ब्र.डेव्हिड काळे (अध्यक्ष, महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद, पिंपरी चिंचवड विभाग), पा.बन्यामिन काळे, पा.सॅमसन चोपडे, पा.संजय कांबळे, ब्र.मनोज पिल्ले, सि.शैला हेक्टर, सि.अपर्णा काळे, सि.वनिता पिल्ले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली.