शबनम न्युज | पुणे
काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ साली बारामतीचा खासदार हा भाजपचा असेल, असा निर्धार व्यक्त केला होता. या वक्तव्याचे प्रत्युत्तर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिले आहे. तसेच २०१९ ची आठवण करून देत पवार यांनी बावनकुळेंना खोचक टोला देखील लगावला.
Advertisement
ते म्हणाले, “आम्हाला काहीही वाटत नाही. असे खूपजण येतात. गेल्या 55 वर्षांत असे कितीतरी जण आले आणि कितीतरी जण गेले. खूप लाटा आलेल्या आणि गेलेल्या बारामतीकरांनी पाहिल्या आहेत. बारामतीकरांना खूप चांगले माहित आहे की, कुणाचे बटण कशा पद्धतीने दाबायचे. ते त्या निवडणुकीत त्यांचे काम चोखपणे बजावतील. याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.” असे वक्तव्य यावेळी अजित पवार यांनी केले.
Advertisement