शबनम न्युज | सांगवी
लायन्स क्लब इंटरनॅशनल रिझन तीन व चार यांच्या वतीने सन 2022 -23 चा शिक्षक कृतज्ञता पुरस्कार देऊन लायन क्लब इंटरॅशनल चे प्रांतपाल एम जे एफ ला. राजेश कोठवदे, ज्येष्ठ समाज सुधारक पद्मश्री गिरीष प्रभुणे, ख्यातनाम कवी व साहित्यिक अनंत राऊत, क्लबचे उप प्रांतपाल सुनील चेकर, यांच्या हस्ते गौरविण्यात आले. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
सामजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सौ. सविता माने या सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील ठोमस गावच्या रहिवाशी असुन सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळ कस्पटे वस्ती शाळेत पदवीधर शिक्षिका म्हणून काम करतं आहेत. सांगवी पुणे येथील सातारा मित्र मंडळाचे अध्यक्ष व लायन क्लब ऑफ पुणे रहाटणी चे खजिनदार शिवाजीराव माने यांच्या त्या पत्नी असून पतीच्या बरोबरीने शैक्षणिक काम व सामाजिक कार्य उत्कृष्टपणे करतं आहेत. तसेच त्या विद्यार्थी
प्रिय शिक्षक आहेत. त्या नेहमीच गोरगरिबांना मदत करत असतात त्यांच्या याच कामाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण कार्यक्रमा वेळी रिजन चेअर पर्सन लायन दिलीप सिंह मोहिते, लायन अनिल झोपे, लायन मुरलीधर साठे, लायन सुदाम मोरे ,लायन क्लब ऑफ पुणे रहाटणीचे अध्यक्ष लायन धीरज कदम , लायन जॉनी थदानी , लायन विजय सारडा, लायन श्रेयस दीक्षित, लॉयन पुनीतजी , लिओ अथर्व माने,ओंकार झणझणे , सन्मानित शिक्षक, सर्व लायन सदस्य उपस्थित होते. लायन दिगंबर ढोकळे सर यांनी सूत्रसंचालन केले व लायन राजीव कुठे यांनी आभार मानले.