पुणे | शबनम न्यूज
रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मूर्ती दान करून नदी प्रदूषण कमी व्हावे या हेतूने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी जनमानस तयार करणे व जागृती करणे या हेतूने राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व प्राध्यापक गणेशघाट- औंध येथे जाऊन श्री गणेश मूर्ती दान स्वीकारले व महानगरपालिकेने उभारलेल्या हौदामध्ये त्यांचे विसर्जन करण्यात आले. औंध येथील जीवित नदी फाउंडेशन यांच्या सहकार्याने महाविद्यालयातील स्वयंसेवक हे काम वर्षभर विविध पद्धतीने करत असतात.
मूर्तिदान स्विकारून एका चांगल्या कार्याची सुरुवात या निमित्ताने झालेली आहे. महाविद्यालयाचे विद्वत प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा स्वयंसेवक, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रमेश रणदिवे, कॉमर्स विभाग प्रमुख डॉ. बंडोपंत कांबळे, मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. प्रभंजन चव्हाण व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सुशीलकुमार गुजर आदी. उपक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी जीवितनदी फाउंडेशनच्या मान. मृणाल मॅडम यांनी व महानगरपालिका स्वयंसेवकांनीही मदत केली.