शबनम न्यूज | पुणे
लायन्स क्लब इंटरनॅशनल, (प्रांत 3243 डी 2) यांच्या वतीने आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी अरण्येश्वर येथील मुक्तांगण हायस्कुलच्या सभागृहात शिक्षक दिनाचे औचित्य साधून पुणे शहरातील आदर्श शिक्षकांचा सन्मान केला.
याप्रसंगी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने व्यंगचित्रे काढणारे ऍग्रोवनचे व्यंगचित्रकार लहू काळे यांचाही सत्कार करण्यात आला. ते केंद्रीय विद्यालयात कलाशिक्षक म्हणून काम करतात.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये लहू काळे यांच्या व्यंगचित्र कामगिरीची दखल घेण्यात आली आहे. तसेच त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
लहू काळे हे मूळचे मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचे. औरंगाबाद व नंतर मुंबईतील जे जे स्कुल ऑफ आर्ट येथे त्यांचे शिक्षण झाले. ऍग्रोवनच्या माध्यमातून त्यांनी शेतीप्रश्नावर आतापर्यंत साडेचार हजाराहून अधिक व्यंगचित्रे काढली असून त्यांनी अनेक प्रदर्शनातूनही भाग घेतला आहे.
आजच्या कार्यक्रम प्रसंगी त्यांच्यासमवेत लायन्स क्लब इको फ्रेंडस् व कार्टुनिस्ट्स कंबाईनचे सदस्य व्यंगचित्रकार विश्वास सूर्यवंशी हेही उपस्थित होते.
ला. प्रकाश नारके यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन लायन्स क्लबचे आंतरराष्ट्रीय संचालक ला. प्रेमचंद बाफना यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून अर्थतज्ञ आशुतोष रारावीकर हे होते. प्रथम उपप्रांतपाल ला. परमानंद शर्मा आणि द्वितीय उपप्रांतपाल ला. सुनील चेकर व 28 क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.