मनोविकास प्रकाशन निर्मित, रवी वाळेकर लिखित ‘इजिप्सी : एका गूढ, अद्भुत देशाची सफर!’ या ग्रंथाचे प्रकाशन रविवारी (ता. १८ सप्टेंबर) सकाळी १०.३० वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि सुप्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होणार असल्याची माहिती मनोविकास प्रकाशनाचे संचालक अरविंद पाटकर यांनी दिली.
अरविंद पाटकर म्हणाले, “इजिप्त हा रहस्यमय असा देश आहे. गूढ आणि अद्भुत अशा या देशाची सफर वाचकांना ‘इजिप्सी’ ग्रंथातून घडणार आहे. प्रा. मिलिंद जोशी, दीपा देशमुख आणि रवी वाळेकर ग्रंथावर आपले विचार मांडणार आहेत. प्राचीन, अनाकलनीय अशा इजिप्शियन संस्कृतीचा उलगडा करण्याचा प्रयत्न या ग्रंथातून झाला आहे. संचालक आशिष पाटकर हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.”