शबनम न्युज | पुणे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले गट ) च्या अल्पसंख्यांक आघाडीची राज्य कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. या आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष खाजाभाई शेख यांच्यावर आता प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेश अध्यक्षपदी पुन्हा पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक ऍड. अयुब शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा येथे रिपाइं (आठवले गट) च्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी विविध विभाग व आघाडींच्या पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या.
दरम्यान, या दोन्ही नवननियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुण्यात सत्कार करण्यात आला. यावेळी फय्याज सनदी, शेखलाल नदाफ, अप्पालाल नदाफ, अमजद जमादार,अश्विनी सहारे, अक्षय दुनधव आदी उपस्थित होते.
पक्षाने सोपविलेली जबाबदारी माझ्या कार्यातून सार्थ ठरवीन, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त सरचिटणीस खाजाभाई शेख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.