शबनम न्युज | पुणे
आपल्या जिवलग मैत्रिणीने आत्महत्या केली असल्याचे कळताच दुसऱ्या ही तरुणीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरच्या टेरेसवर जाऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील हडपसर परिसरात ही घटना घडली. सारिका हरिश्चंद्र भागवत (वय.१९) आणि आकांशा औदुंबर गायकवाड (वय.१९ दोघी ही रा. हडपसर, शेवाळेवाडी ) अशी मृत तरुणींचे नावे आहेत. सानिका आणि आकांक्षा या दोघीही लहानपणापासून एकमेकांच्या जवळच्या मैत्रिणी होत्या. सारिका ने आत्महत्या केल्यानंतर आकांशानेही स्वतःचे जीवन संपविले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिका हिने मंगळवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. पोलिसांचे पथक सारिका च्या घरी प्राथमिक तपास करत असतानाच आकांक्षा तेथे पोहोचली आणि सारिकाला मृत अवस्थेत पाहताच तिला धक्का बसला. सारिकाचा मृतदेह घरातून बाहेर काढून रुग्णवाहिकेत नेला असता, आकांशा हिने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरच्या टेरेसवर जाऊन आत्महत्या केली.
या दोघीही स्थानिक महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या आणि एकमेकांच्या जवळ राहत होत्या. सानिका आणि आकांक्षा यांनी टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही. यासंदर्भात पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक करीत आहेत.