शबनम न्युज | अहमदनगर
श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या प्रक्षेत्राला जिल्हा परिषद अहमदनगर अधिकाऱ्यांच्या पथकाने कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने ला भेट दिली. या पथकामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील, शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके तसेच सर्व विभाग प्रमुख, दहिगाव-ने गावचे सरपंच सुभाष पवार, उपसरपंच राजाराम पाऊलबुद्धे, ग्रामविकास अधिकारी रामकिसन बटुळे उपस्थित होते.
या भेटी दरम्यान कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने करत असलेल्या कार्याची माहिती विषय विशेषज्ञ माणिक लाखे यांनी दिली. तसेच लोकनेते मारुतराव घुले पाटील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा द्वारे उत्पादित करण्यात येणाऱ्या शेती उपयुक्त जैविक उत्पादनांची माहिती विभाग प्रमुख डॉ. भास्कर ताकटे पथकाला यांनी दिली. मुख्याधिकारी येरेकर यांनी केव्हीके दहिगाव-ने करत असलेल्या कामाची चर्चा केव्हीके च्या शास्त्रज्ञांसोबत केली. केव्हीके दहिगाव-ने चे कार्य प्रेरणादायी आहे या शब्दात मुख्याधिकारी आशिष येरेकर यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या कामाचे कौतुक केले. तसेच जिल्हा परिषद कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने यांनी एकत्र मिळून शेतकऱ्यांसाठी काय काम करता येईल यावर चर्चा केली. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील यांनी देखील केंद्राच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी केव्हीके चे शास्त्रज्ञ इंजि.राहुल पाटील, प्रकाश बहिरट, प्रविण देशमुख, दत्तात्रय वंजारी, दहिगाव-ने ग्रामपंचायतीचे सदस्य सुरेश घानमोडे, विलासराव लोखंडे, शब्बीर शेख, बाळासाहेब मरकड, गणेश देशमुख उपस्थित होते.