शबनम न्युज | मुंबई
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आज संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी संपणार होती. पण, आज या सुनावणीत कोर्टाने त्यांच्या कोठडीत आणखी तेवढ्या दिवसांची वाढ केली आहे. तसेच सुरुवातीपासूनच संजय राऊत यांना जामीन मिळू नये, अशी ईडीची भूमिका होती.
मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचार घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आले आहे. मुंबईतील १ हजार ३४ कोटींच्या पत्राचार पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचा अर्थ रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे.
Advertisement