शबनम न्युज | पुणे
पुणे शहरातील नऱ्हे परिसरात मध्यरात्री इमारतीच्या पार्किंगमध्ये सहा वाहनांना आग लागल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री २ : १८ वाजता नऱ्हे मधील हरिहरेश्वर पार्क, बी विंग, माताजी नगर पुणे ४१, या ठिकाणी आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली असता, तात्काळ नवले अग्निशमन केंद्राचे अग्निशमन वाहन तेथे रवाना झाले. जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करून आग पूर्ण भिजवत धोका दूर केला. तत्पूर्वी तेथील स्थानिकांनी देखील बादली व नळीच्या साह्याने पाणी मारत आग विचवण्याचा प्रयत्न केला.
सदर घटनेमध्ये चार दुचाकी व दोन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. तसेच पार्किंगच्या वरील बिल्डिंगच्या काही भागाला आगीची झळ लागल्याचे दिसून आले. अद्यापही आग लागल्याचे कारण समजू शकलेले नाही.
Advertisement