शबनम न्युज | पुणे
रविवार दि.१८/०९/२०२२ ला नवसारी, गुजरात येथे १० वे विहार सेवा संमेलन बांधव बेलडी प.पु.आ.अक्षयबोधीसुरिश्वर म.सा.प.पु.आ.महाबोधीसुरिश्वर म.सा.यांच्या निश्रा सान्निध्यात तथा अनेक श्रमण-श्रमणी भगवंताच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
विहार सेवा म्हणजे जैन साधु-साध्वीजी भगवंत चातुर्मासानंतर धर्म प्रभावना करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पायी विचरण करतात त्याला विहार म्हणतात, त्या दरम्यान त्यांना सुरक्षित रित्या पोहोचण्यासाठी मदद करने म्हणजे विहार सेवा. विहार सेवा देणारे विहार सेवकांना प्रेरणा मिळावी ह्या साठी दरवर्षी विहार संमेलनाचे आयोजन केले जाते.
नवसारी येथे आयोजित विहार संमेलनात देशभरातुन २३०० हुन अधिक विहार सेवक उपस्थित होते,महाराष्ट्रासाठीचा सर्वोत्तम विहार सेवा ग्रुप चा पुरस्कार विहार सेवा ग्रुप पीसीएमसी ला मिळाला ही पिंपरी चिंचवडवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
विहार सेवा ग्रुप पिसीएमसी प्रमुख भद्रेश शहा,विनोद जैन,मनोज जैन,जवाहरजी मुथा,राजेंद्रजी कटारिया, सुरेश जैन,राजुभाई चोपडा,संतोष लुंकड,राजेंद्र कोठारी,शितल शहा,विशाल बोरा,भरत कवाड,अमुल हुंडीया,संजीव सुराणा,डॉ.अजय जैन,प्रविण सोनिगरा, मनिष सोनिगरा,राजु रांका,गुप्तेश मेहता,पुष्पक मेहता आदी ५० विहार सेवक संमेलनासाठी उपस्थित होते.