शबनम न्युज | पुणे
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ नृत्यकथी’ या कार्यक्रमाचे आयोजन शनीवार, २४ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे करण्यात आले आहे.
नृत्यांजली डान्स अकॅडमी प्रस्तुत या कार्यक्रमात संस्कृत काव्य आणि कथांचा अविष्कार सादर केला जाणार आहे. संध्या धर्म आणि मिता पाठक यांचे दिग्दर्शन आहे.मिता पाठक,यशश्री जाधव,आर्या गिजरे,मैथिली दिवेकर,जान्हवी कशेळीकर,अवनी जवखेडकर,श्रावणी एंचवार,साक्षी पासकंटी,दर्शना पासकंटी सहभागी होणार आहेत.
हा कार्यक्रम विनामूल्य आहे.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १४० वा कार्यक्रम आहे. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.