शबनम न्युज | औरंगाबाद
प्रतिनिधी | विशाल खुणे
औरंगाबाद : ७ सप्टेंबर रोजी श्रीयश प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य भाजप प्रदेश उपाध्यक्ष बसवराजजी मंगरूळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी म्हणून श्रीयश प्रतिष्ठान औरंगाबाद हे नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहिले आहे, अश्याच एका सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री वृद्धाश्रमात करण्यात आले होते, या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून श्रीयश प्रतिष्ठानचे सी.ई.ओ. कर्नल जॉय डॅनियल उपस्थित होते.
या उपक्रमासाठी श्रीयश प्रतिष्ठानचे संचालक प्रभाकर माशाळकर, प्राचार्य डॉ. बी. एम. पाटील, प्राचार्य डॉ. जी. जी. तापडिया आदींनी सहकार्य केले.
या सामाजिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी प्रा. दत्ता खाडे, प्रा. हर्षल चोथे, प्रा. किशन जैस्वाल, प्रा. ब्रिजभूषण शुक्ला, प्रा. हुजेब पठाण, डॉ. शेख सइद परमेश्वर म्हस्के आदींनी विशेष परिश्रम घेतले.