शबनम न्युज | पुणे
पुण्यात १ ऑक्टोबर रोजी सीएनजी पंप बंद ठेवण्यात येणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार, सीएनजीच्या ट्रेड डीलर मर्जींमध्ये वाढ व्हावी, याकरिता शहरात सीएनजी पंप एक ऑक्टोबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे . यामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीवर मात्र मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनतर्फे टॉरेंट गॅस पंपावर १ ऑक्टोबर रोजी सीएनजी विक्री होणार नसल्याची माहिती देण्यात आली. पेट्रोलियम मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार सीएनजीच्या ट्रेड डीलर मार्जिनमध्ये वाढ व्हावी, या प्रमुख मागणीसाठी हा बंद पुकारण्यात येणार आहे.
Advertisement