शबनम न्युज | पुणे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा नेते राहुल बालवडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. पुण्याचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या पुढाकाराने हा पक्ष प्रवेश संपन्न झाला.
यावेळी आनंदा कांबळे, विशाल बालवडकर, तुषार बालवडकर, शशिकांत बालवडकर, प्रशांत बालवडकर, सागर बालवडकर, राजेश बालवडकर, अथर्व बालवडकर आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
Advertisement
याप्रसंगी महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, खासदार सुनिल तटकरे, आमदार अतुल बेनके, कोथरुड मतदार संघाचे कार्याध्यक्ष नितीन कळमकर, मनोज बालवडकर, समिर चांदेरे, गणपत मुरकुटे, देवीदास मुरकुटे, संजय ताम्हाणे, अरुण खंडेलवाल, चेतन बालवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.